काँक्रिटच्या कट्टयावर!
खिडकीच्या गजातून ऊन रखरखते
काँक्रटच्या कट्टयावर,
आणि कुंडीतली तुळस
तृषेनं तळमळते
सूर्याचा ताप
अंगलट करता,
मंजुळांत जांभळं
घामोळ भरते.......
आंत पंख्याचं चक्र
चिरचिरते
अन् चिमणीचं घरटं
खाली पडते
अचानक आभाळी
मळभ चढते
सरसर श्रावणाची
सर झडते
मग काँक्रिटच्या कट्टयावर
तुळस डोलते!
Recommend