ओथंब.........
भरलेलीच राहातात काही शल्ये
मनाला करीत खंती
ओथंबल्या मेघांसारखी कोसळून
आसवाना वाहीत नाहीत
दुराव्यात दूर राहातात एकटी.......
जाणतो हे आम्ही
भेटता तुम्हा वर्षाकाठी
खूप केलंत तुम्ही मुलांसाठी
पण हाती घेता निवृत्तीची काठी
उसवल्या तुम्ही
वीणलेल्या जन्मगाठी
जरी जिव्हाळ्याची राहिली नाती
आम्हीही मांडलाहे संसार
श्रमही घेतो अपार
मुलांसाठी
तीही लवकर होतील मोठी
तुमच्यासारखी
आम्हालही
कळ सोसावी लागेल शेवटी?
Recommend